ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
थरचे वाळवंट
थरचे वाळवंट : भारतीय उपखंडातील सर्वांत मोठे वाळवंट. क्षेत्र सु. २,५९,००० चौ. कीमी. असून हे कच्छच्या रणापासून उत्तर वायव्येकडे ८०५ किमी. आणि अरवली पर्वतापासून वायव्येस ४८३ किमी. सिंधू नदीच्या खोऱ्यापर्यंत पसरलेले आहे. भारत–पाकिस्तानमधील आंतरराष्ट्रीय सीमा या वाळवंटातून जाते. पूर्वी या वाळवंटाला ‘मरुस्थली’ म्हणत. यालाच ‘भारताचे मोठे वाळवंट’ म्हणतात.
वाळवंटीकरण रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाची मोहीम
जगभरात हवामानबदलामुळे एका बाजूला मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आहे, तर दुसरीकडे दुष्काळी प्रदेशातही वाढ होत आहे. आज जगातील एकतृतीयांश लोकसंख्या कोरडवाहू भागातील आहे.
आटाकामा वाळवंट
आटाकामा वाळवंट : दक्षिण अमेरिकेच्या प. किनाऱ्यावरील मरुस्थल. अक्षांश ५० ते ३०० द. पेरू देशाच्या दक्षिण सरहद्दीपासून चिलीमधील कोप्यापो नदीपर्यंत हे सु. ९६० किमी. लांब व पश्चिमेस पॅसिफिक किनाऱ्यावरील पर्वतश्रेणीपासून पूर्वेस अँडीज पर्वताच्या डोमेको श्रेणीपर्यंत सु. ३३ ते ८० किमी. रुंद आहे.
ईजिप्त
ईजिप्त : (मिस्र; अधिकृत : युनायटेड अरब रिपब्लिक). आफ्रिका खंडाच्या ईशान्येकडील राष्ट्र. याचा सिनाई द्वीपकल्पाचा भाग आशियामध्ये मोडतो. क्षेत्रफळ १०,०२,००० चौ. किमी. (पैकी ३.६% कायम वस्तीयोग्य); लोकसंख्या ३,३३,२९,००० (१९७१ अंदाज).
गवताळ प्रदेश
गवताळ प्रदेश : पृथ्वीवर उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंधांत कोरड्या हवेचे ओसाड, वाळवंटी प्रदेश आणि आर्द्र हवेचे अरण्यप्रदेश यांच्या दरम्यान, खंडांच्या अंतर्भागात मुख्यत:गवताने निसर्गतःच आच्छादलेले विस्तृत, सपाट मैदानी किंवा पठारी प्रदेश आढळतात.
छत्री खडक
छत्री खडक : वाऱ्याच्या कार्याने प्रामुख्याने वाळवंटात आढळून येणाऱ्या विशिष्ट आकाराच्या खडकाला छत्री खडक म्हणतात. या खडकाचा वरचा भाग रुंद व बहिर्वक्र, मधला भाग चिंचोळा आणि खालचा पाया थोडासा रुंद असतो.
लिबियन वाळवंट
लिबियन वाळवंट : आफ्रिका खंडातील सहारा वाळवंटाचा ईशान्य भाग ‘लिबियन वाळवंट’ म्हणून ओळखला जातो. याचा विस्तार उत्तर आफ्रिकेतील लिबिया, ईजिप्तचा पश्चिम भाग व सूदानचा उत्तर भाग यांमध्ये म्हणजेच नाईल नदीच्या पश्चिम भागात आहे. साधारणपणे २१° ते २८° उ. अक्षवृत्त व २०° ते ३१° पू. रेखावृत्तांच्या दरम्यान हे वाळवंट असून ईजिप्तमधील याचा भाग ‘वेस्टर्न डेझर्ट’ या नावाने ओळखला जातो.
वाळवंट
वाळवंट म्हणजे पृथ्वीच्या भूपृष्ठभागावरील असा अतिकोरडा प्रदेश, की जेथे वनस्पती व प्राणिजीवन अत्यंत विरळ असते. सामान्यपणे शुष्क, ओसाड व वालुकामय भूमीला वाळवंट म्हणून ओळखले जात असले, तरी तांत्रिक दृष्ट्या वसाहतीच्या दृष्टीने अतिथंड प्रदेशांचाही यात समावेश केला जातो.
वाळवंटीकरण व दुष्काळ विरोधी दिन - १७ जून
वाळवंटीकरण व दुष्काळ विरोधी जागृती करण्यासाठी हा दिवस पाळला जातो.
सहारा
सहारा : जगातील सर्वांत मोठे उष्ण कटिबंधीय वाळवंट. अरबी भाषेतील ‘ सहारा ’ म्हणजे ‘ वाळवंट ’ यावरून या प्रदेशाला हे नाव पडले आहे. उत्तर गोलार्धातील या वाळवंटाने उत्तर आफिकेचा विस्तृत प्रदेश व्यापलेला आहे.
English to Hindi Transliterate